Poem (Marathi) ‘Kṣhaṇa hā bhāgyāchā (The Moment is of Good Furtune)’ by Kishan More, Pune from 1986-0400 Sahaj Yog (Marathi), Volume 1, Issue 10, Page 4, Column 1
इतके दिवस मी फूल होतो, पण फुलपाखरांची येजा नव्हती.
इतके दिवस मी फुल होतो, पण भुंग्यांच गुंजारव नव्हते.
कारण मला रंग नव्हता, मला गंध नव्हता;
'सहजयोगे' मी रंग गंधात न्हाऊन गेलोय
मी धुळीत पडलेला दगड होतो, पायदळी तुडवलेला धुलीकण होतो.
'आत्मज्ञानाने' मला नवीन पैलू पडत आहेत, मी हिरा होतोय
मी अंधारात चाचपडत भटकत होतो, धडपडत होतो.
पायं ठेचाळत होते, रक्ताळत होते.
आधारामाठी चहुकडे व्याकुळतेने पहात होतो.
'आत्मशक्तीचा' आधार मला गवसलाय, तो मला प्रकाशात
घेऊन आलाय
मी अंधाराच्या साम्राज्यात आयुष्य कंठीत होतो.
पहाट कधी होतच नव्हती.
आता अरूणोदय झाला आहे; सूर्य आता तळपणार आहे
मी सवयीचा गुलाम होतो; माच माझ्यात गुंग होतो.
दुःखी वष्टी होऊन आयुष्य कंठीत होतो.
सहयोगाच्या स्विकृतीने मो बदलू पहातोय.
मी आता "स्वतंत्र" झालोय
बात नसलेला मी दीप होतो. दीप कधी प्रज्वलीत होत नव्हता.
तसा प्रयत्नही केला नव्हता. मी आता प्रज्वलीत झालोय.
दोषांच्या अंधःकाराच्या निर्मुलनासाठी
मो रंग होतो; कुंचला होतो.
कलाकृती जमत नव्हतो, रंगसंगती खुलत नव्हती.
माझ्यात क्रांती होत आहे. मीच आता चित्र होतोय
मी सवार होतो, अडगळीत, धुळीत पडलो होतो.
स्वरांची ओळख नव्हतो, गीतांची मधुरता ज्ञात नव्हती.
स्वर आता झंकारू लागलेत, मलाच मंत्रमुग्ध करु लागलेत
इतके दिवस अश्रू ओघळत होते; अश्रूचा अर्थ कळत नव्हता.
आता अश्रू मोती बनलेत, जोवन पवित्रतेत विलीन होऊ पाहतेय.
मी आकाश गंगेतला तारा झालोय, लक्षलक्ष ता-यांची संगत आहे.
यातून मी निखळणार नाही, 'कुंडलिनी' रुपी धाग्यात
मी गुंफला गेलोय
मी एक फूल होतो, सुकत होतो, कोमेजत होतो;
आता मी 'चैतन्याने' तजेलदार झालोय.
प्रत्येक फुलाची इच्छा असते, निर्माल्य परमेश्वर चरणी व्हावे.
'आदीशक्तीच्या' चरणाजवळ विलीन व्हावे
हीच या फूलाची उत्कंट इच्छा आहे
एकच क्षण भाग्याचा, 'सहजयोगाच्या' स्विकृतीचा.
आता मी तृप्त आहे, आता मी शांत आहे
काव्यकुसुमांची ही माला, 'निर्मला' आई मुळे स्फुरतेय.
कारण तीच आपली स्फुर्ती आहे, तीच आपले मांगल्य आहे.
तिच्याश्च चरणी ही माला मी सर्मपीत करतो आहे
'जय माताजी,' 'जय माताजी,' अशीच या फुलांची स्वर सुगंध बरसात आहे.
पवित्रतेत, मधुरतेत, आनंदसमुद्रात ही जलधारा विलीन होत आहे
_by_Shri_Kishan_More_Pune_from_1986-0400_Sahaj_Yog_(Marathi)_Volume_1_Issue_10_Page_4_Column_1.jpg)